Breaking News

अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा

राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणुक आयोगाकडे केली.

राज्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत अतुल लोंढे म्हणतात की, सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा आणि अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करुन महिलांची बदनामी केली.

मुनगंटीवार यांनी चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला खीळ घालणारा व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी नसून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी, त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणूका लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *