Breaking News

Tag Archives: sudhir mungantiwar

राज्यपालांनी अहवाल त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

भाजपा सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील घटनारी वृक्षसंख्येवर मात करण्यासाठी आणि वृक्ष लागवड होवून पर्यावरण संतुलन रहावे यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची घोषणा केली. मात्र या योजनेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत …

Read More »

मुनगुंटीवारांचा चिमटा तर गृहमंत्री देशमुखांकडून गजल गाऊन दुःखावर फुंकर विधानसभेतील चिमट्यांनी एकच हास्यकल्लोळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून मागील दोन दिवसांपासून सतत मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत भाजपाने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यावरून मंत्रिमंडळात गृहमंत्री पद आपल्यालाच का मिळाले? दुसरे खाते का मिळाले नाही? असा प्रश्न कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांना पडला असेल. तसेच मागील दोन दिवस सुरु असलेल्या गदारोळावरून तुमचे दुःख …

Read More »

विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …

Read More »

अजित पवारांना पडला प्रश्न म्हणाले सुधीर भाऊंना झालेय काय ? सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची मिश्कील सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली. विधानसभेत आज विरोधकांनी …

Read More »

जळगांवच्या त्या प्रकरणात चौकशी अंती तथ्य नसल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई: प्रतिनिधी पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महिला वसतीगृहातील तरूणींना कपडे काढून नाचविल्याच्या एका वृत्तामुळे विधिमंडळाच्या सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी चांगलेच लावून धरले. त्यावर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा महिला उच्च अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशी समितीचा अहवाल आज विधिमंडळात मांडताना असा कोणताही प्रकार तेथील वसतीगृहात …

Read More »

नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेस-भाजपामध्ये खडाजंगी

मुंबईः विशेष प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी काही जणांकडून निधी संकलनाचे काम करण्यात येत आहे. मात्र निधी न दिल्यास धमकाविण्याचे प्रकार सुरु असून सकाळीच कुलकर्णी व्यक्तीने येवून यासंदर्भातील माहिती दिली. त्यामुळे राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा ठेका यांना कोणी दिला असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी करत अशांवर कारवाई …

Read More »

समता प्रतिष्ठान आर्थिक घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी : अधिकारी निलंबित सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची विधानसभेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने तत्कालीन सरकारने नागपूर येथील समता प्रतिष्ठानच्या मार्फत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघड झाले असून याशी संबंधित अधिकाऱ्यांनी कॅग कडे यासंदर्भातील काही माहितीही जाणीवपूर्वक लपवल्याचेही स्पष्ट झाल्याने समता प्रतिष्ठानच्या आर्थिक गैव्यवहाराची …

Read More »

“आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे” मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतित्तुर मस्करी करा, थट्टा करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असा फडणवीस, मुनगंटीवार यांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना परिस्थितीबरोबरच इतर मुद्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावंर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार उत्तर देत आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे असा संत तुकारामाच्या अंभागातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार करत टीका करायची असेल तर खुशाल करा पण …

Read More »

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत आमच्या आया-बहिणीची थट्टा होणार असेल आणि त्या सुरक्षित नसतील तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंटीवार …

Read More »