Breaking News

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर बोरघाटात आणि समतल भागात या वेगाने वाहने चालवा

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि कामाच्या निमित्ताने पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. त्यातच बोरघाट आणि समतल भागात प्रवासी वाहनांचा वेग आधीच निश्चित केला असल्याने अनेक वाहनांचा अपघात घडल्याचे आणि त्या अपघातातून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसच्या वाहतूक शाखेकडून बोरघाटातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांच्या वेगाविषयी नव्याने वेगमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय काल रात्री उशीराने जारी केला.

काही महिन्यापूर्वी मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्या अपघातात वाहन चालकाने वाहनाच्या गती अर्थात वेग नियमानुसार गाडी चालवली. परंतु सदर दुसऱ्या गाडीचा वेगही त्या प्रमाणात नव्हता. त्यामुळे झालेल्या त्या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाल्याची माहिती पुढे आली होती.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर यापूर्वी बोरगाटातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी चढण असल्याने छोट्या वाहनांसाठी ५० किमी प्रतितास वेग मर्यादा असा निर्धारीत करण्यात आला होता. तर मालवाहतूक-सामानाची ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी प्रतितास ४० किमी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली होती. तर समतल अर्थात सपाट पध्दतीने असणाऱ्या रस्त्यावर १०० किमी प्रतितास वेग निश्चित करण्यात आले होते.

परंतु चढण आणि उतार असलेल्या बोरघाटात ४० ची प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर समतल रस्त्याने जाताना १०० आणि ८० किमी प्रतितास निश्चित करण्यात आला आहे.

यासंदर्भातील महाराष्ट्र पोलिस वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आलेला निर्णय खालीलप्रमाणे….

 

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *