Breaking News

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सातत्याने शिवसेना उबाठा गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपाला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जाहिरसभा सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवेसनेने रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर संध्याकाळी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.

मागील दोन टर्मपासून दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत हे सातत्याने लोकसभेवर निवडूण जात आहेत. आता तिसऱ्यांदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अरविंद सावंत यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी जाहिर केली आहे. अरविंद जाधव हे शिवसेना उबाठा गटाचे निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जात आहे.

यापूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडणाऱ असल्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु होती. तर पुन्हा या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून कधी मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा तर कधी भाजपाच्या तथा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती. परंतु भाजपाकडून या भागात तीन तीन वेळा सर्व्हे करण्यात आला. परंतु या तिन्ही वेळच्या सर्व्हेत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव होणार असल्याचे दाखविण्यात आले. यापार्श्वभूमीवर अखेर हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आला.

या मतदारसंघातूनही तुल्यबळ उमेदवारांना उतरविण्याचा प्रयत्न भाजपा शिंदे गटाकडून जाहिर करण्यात आला. मात्र अखेर शिंदे गटाकडून भायखळा आमदार यामिनी जाधव यांच्या नावावर भाजपाचे एकमत झाले. त्यानंतर शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आले.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *