Breaking News

अखेर उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून अखेर खरी शिवसेना आणि नकली शिवसेना असा वाद भाजपाच्या नेत्यांनी राज्यात सुरु करू दिला. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याविषयीची याचिका प्रलंबित आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी या आधीच जाहिर केल्याप्रमाणे जनतेच्या दरबारात खरी शिवसेना कोणाची हे दिसून येईल असे यापूर्वीच जाहिर केले. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि आमदार रविंद्र वायकर यांना शिंदे गटात आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरले आहे. परंतु आता लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आज उमेदवारी जाहिर केली.

शिंदे गटाचे रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. रविंद्र वायकर यांची लढत शिंदे गटाचेच केंद्रीय पदाधिकारी तथा माजी खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे शिवसेना उबाठा गटाकडून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांकडून अमोल किर्तीकर यांच्या मागे सध्या विविध कारणाखाली चौकशीचा ससेमिरा सुरु आहे.

लोकसभा निवडणूका जाहिर होण्याच्या काही काळ आधी रविंद्र वायकर यांच्यामागेही केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता. मात्र रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविताच रविद्र वायकर यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा तुर्तास थांबला आहे. तसेच शिंदे गटाच्या अटी व शर्तीनुसार रविंद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार रविंद्र वायकर यांना शिंदे यांच्या शिवसेनेने औपचारीकपणे आज उमेदवारी जाहिर केली आहे.

शिंदे गटानेही रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहिर केल्याने पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघात शिंदे विरूध्द ठाकरे असा सामना मुंबईत पाह्यला मिळणार आहे.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *