Breaking News

Tag Archives: shivsena

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत असून गडकरी …

Read More »

धर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक …

Read More »

रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …

Read More »

राऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार

मुंबई: प्रतिनिधी वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना धमकी दिल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस करत आहेत. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या …

Read More »

न्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या कंगना राणावत हीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगल्याच कानपिचक्या देत स्वतःच्या वक्तव्यांना आवर घालण्याचे निर्देश दिले. मात्र कंगनाच्या घरावर महापालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत तिला बजाविण्यात आलेली नोटीस अवैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. शिवसेना प्रवक्ते …

Read More »

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण …

Read More »

संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच

मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला. ते …

Read More »

शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर

मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …

Read More »

गरीबीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मंत्र्याने अखेर पदवी मिळवलीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा आदर्श

मुंबई : प्रतिनिधी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून स्वत:बरोबर घरच्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी धरली. मात्र कालापरत्वे या विपरीत परिस्थितीवर मात करत सधनता मिळविल्यानंतरही आणि व्यस्त राजकिय जीवनातही आपले शिक्षण पूर्ण करून पदवी मिळणारे थोडेच असतात. या थोड्यांमध्ये आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला असून त्यांनी नुकतीच …

Read More »

स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र

मुंबई : प्रतिनिधी  भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व  छगन भुजबळ …

Read More »