Breaking News

Tag Archives: sudhir mungantiwar

सुधीर मुनगंटीवार यांना सुषमा अंधारे यांचा टोला, बुंदसे गयी वो….. नकारात्मकता वाढत असल्याने तसे वक्तव्य करत आहेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा घडविण्यासाठी पहाटेचा शपथविधी गरजेचा होता, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी एका वर्तमान पत्राच्या कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा देशातील २२ राज्यांच्या राजधान्यांमध्ये साजरा करणार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मुनगंटीवार यांची निवड

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेत अलीकडेच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राज्याच्या सांस्कृतिक …

Read More »

अजित पवार यांची मागणी, सत्य येणे आवश्यक; निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश द्या राज्यपाल रमेश बैस यांना पत्र ;सरकारचे प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्या...

खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी अजित पवार यांनी पत्रात म्हटले की, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा ‘ना भूतो न भविष्यती’ अशा महासोहळ्याची जय्यत तयारी

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू …

Read More »

वनमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा, व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प हत्ती संवादकाची मदत घेणार

राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील …

Read More »

राज्यात २ दिवसांची टोलमाफी अमित शाहंसाठी की आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिष्यगणांसाठी ? महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १६ एप्रिलला पण टोल माफी दोन दिवसांची, गौडबंगाल काय

मागील ८ वर्षापासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. मात्र परंतु श्रीलंका देश दिवाळखोरीत निघाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने मोफत सवलतींवरून आपल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आता एकप्रकारे भाजपाच्याच सहभागाने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी या तीन म़राठी चित्रपटांची निवड ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांचा समावेश

राज्य शासनाकडून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. २०२३ मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटरी” आणि …

Read More »

उध्दवजी तुम्ही खतं देण्याऐवजी भलतंच दिलत, सुधीर मुनगंटीवारांची उध्दव ठाकरेंना साद उध्दव ठाकरेंनी मात्र तुम्ही निरमा टाकलात असे उत्तर

भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली आणि २०१९ साली महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग महाराष्ट्रात झाला. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी त्याचेच पडसाद …

Read More »