Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला,… भाजपाची अवस्था विचित्र झालीय

लहान असताना राम राम म्हणटलं की भूत पळू जायची असे मी ऐकत होतो. पण ते खरं की खोटं मला माहित नाही. परंतु आता १० वर्षे देशाची सत्ता एकहाती राहिली. मात्र आता भाजपाची अवस्था विचित्र झाली आहे. आता त्यांना समोर पराभव दिसत असल्याने सारखं राम राम म्हणत आहेत, तशी अवस्था भाजपाची झाली आहे असा उपरोधिक टोलाही यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

मातोश्री येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते. यावेळी दिवाकर रावते आणि प्रवक्ते संजय राऊत आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी आम्ही एनडीएचे घटक होतो. त्यामुळे त्यावेळी जे सरकार आले. त्या सरकारमध्ये सहभागीही झालो होतो. मात्र त्यांनी मैत्रीलाच सुरुंग लावला. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. परंतु १० वर्षे केंद्रातील सत्तेत राहिल्यानंतरही यांची सत्तेची हाव सुटली नाही. आता यांना देशात निवडणूकाच घ्यायच्या नाहीत की पुन्हा मतदारांच्या दारात जायचं नसल्याने यांना पाशवी बहुमत हवं आहे. त्यामुळे देशाचं संविधान धोक्यात आलं आहे. ते वाचविण्याची गरज असे मतही यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे इंडिया आघाडीचा जो काही जाहिरनामा आहे तो पूर्ण आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर काही नवे मुद्दे समाविष्ट करायची असतील किंवा केंद्र सरकारच्या मदतीने करून घ्यायची असतील त्या अनुषंगाने शिवसेना उबाठा पक्षाचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रातील काही प्रश्नांच्या अनुषंगाने हा जाहिरनामा अर्थात वचन नामा आज जाहिर करत असल्याचे यावेळी जाहिर केले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर राज्यातील पोकळ सरकार महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर या राज्यातील उद्योग, हिरे-सोन्याचा व्यापार आदी गोष्टी पळवून नेला. याशिवाय महाराष्ट्राचं वैभवही लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील पळवून नेलंले उद्योग आणि गतवैभव परत मिळवूण आणणार असल्याचे सांगितले.

https://twitter.com/OfficeofUT/status/1783497676006604886/photo/1

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही काही लगेच गुजरातला ओरबाडून नेलेले उद्योग काही परत आणणार नाही. इतकंच नव्हे तर देशातील गुजरात, सिक्कीम, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामीळनाडू या सर्व राज्यांना तेथील गरजांच्या अनुषंगाने सर्व गोष्टींचे समसमान वाटप करू असेही यावेळी जाहिर केले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, याशिवाय देशात सरकार आल्यानंतर राज्यातील अनेक तरूण आता रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी परदेशीही जात असल्याचे ऐकलं आहे. त्यामुळे असं जर कोणी जात असेल तर अशा तरूणासाठी त्याच जिल्ह्यात, तालुक्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या विविध खतं, बियाणे आणि वस्तूंवर आकारण्यात येणारा जीएसटी कर माफ करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून या वचननामा ठेवण्यात आला आहे. याशिवाय मागील काही वर्षात शेतकऱ्यांना सन्मान निधीचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र आमचे सरकार आल्यानंतर तो सन्मान निधी तसाच ठेवून त्यात काही वाढ करता येईल का या अनुषंगाने निश्चित प्रयत्न करणार आहे. तसेच महाराष्ट्रात आणि देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून नाणार सारखे विनाशकारी प्रकल्प राज्यात कधीही आणू दिले जाणार नाहीत. तसेच राज्यात पर्यावरण स्नेही विकास आणि उद्योग आणण्याकडे सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

तसेच शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या जीएसटी कर आणि कर चुकवेगिरीवरून ज्या काही धाडी पडत आहेत. नागरिकांच्या प्रत्येक वस्तुवर कराची आकारणी सारख्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाश्वक वस्तूंवरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देण्यात येणार आहे. याशिवाय कशावरील कर कमी करता येतील आणि कशावरील कर काढून टाकता येईल यासाठी अर्थतंज्ञांशी चर्चा करून सुखदायक जीवन प्रत्येकाला कसे जगता येईल यावर आमचा भर राहणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीही देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर घटनेतील ५० टक्केची मर्यादा काढून टाकावी लागेल. तो निर्णय संसदेतच करता येतो. त्यामुळे सरकार आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *