Breaking News

Tag Archives: election

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार …

Read More »

राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहिरः सोनिया गांधी, चंद्रकांत हंडोरे, अभिषेक मनु सिंघवी…

राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, विधानसभाध्यक्ष जर मुख्यमंत्र्यांच्या घरी जात…

मागील दिड वर्षापासून ठाकरे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असताना त्यावर विधानसभाध्यक्षांनी वेळकाढू पणा केल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकशाहीच्या प्रथेनुसार विधानसभा अध्यक्ष हे कधीही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरी जात नाहीत. एखादे काम असेल किंवा काही आदेश द्यायचे असतील तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण …

Read More »

“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले

लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा …

Read More »

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश, आरक्षणाच्या वादात पडू नका…

मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्ये करून अडचणीत आलेले मनसे नेते राज ठाकरे यांनी या वादात पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पडू नये अशा सुचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असेही आदेशही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले. दरम्यान मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली २५ नोव्हेंबरच्या मुदतीची आठवण दुकानदारांना …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, SC मध्ये मादिगा समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार

सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार …

Read More »

निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …

Read More »

२ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान ३ हजार ८० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपातील मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय २४ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

नाना पटोले म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक तर अधिवेशनाआधी… शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित

राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले …

Read More »