सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार असून मादिगा समाजाची आरक्षणाचा लाभ मिळवून देणार असल्याची घोषणा केली.
मागील तीन दशकापासून मादिगा समाज हा अनुसूचित जातीत समावेश करावा या मागणीसाठी आपला सामजिक लढा लढत असून सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. तसेच मादिगा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मंदा कृष्णा यांनी मादिगा आरक्षण पुर्ता ही संघटनाही स्थापन केली. या संघटनेच्यावतीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे आरक्षणाची मागणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक दुर्लक्षित समाजाच्या उन्नतीसाठी कटिबध्द आणि त्यांच्या दुर्लक्षित समाजाच्या आर्थिक प्रगतीचे आश्वासन कोणी देत असेल तर फक्त भाजपाच त्याची पूर्तता करू शकते. त्यामुळे मादिगा समाजाच्या आरक्षणाच्या अनुशंगाने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत या संदर्भात मादिगा समाजावर होत असलेला अन्यायही दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सर्व समाजासोबत योग्य तो न्याय दिला जाईल यादृष्टीने काम फक्त भाजपाच करू शकते. त्यासाठी आर्थिक विकास करणं गरजेचे असून राज्यात जर डबल इंजिनचे सरकार असल्यास विकासाला गती आणखी मिळेल आणि आर्थिक उन्नतीची संधी मिळेल असा विश्वासही देताना म्हणाले की, मादिगा समाजाच्या लढ्यात १९९४ पासून सोबत असून आता हा लढा संपायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणातील जनतेसाठी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाने २० लाख टन तांदळाची तातडीने खरेदी करावी असे आदेश देत या खरेदीसाठी निवडणूकीचे कारण आणि त्यातील नियमांचे राज्याच्या प्रशासनाने कारण देऊ नये असे सांगत शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. तसेच तेलंगणातून १.२ लाख कोटींचे धान्य केंद्र सरकारने खरेदी केल्याचेही सांगितले.
I laud the Madiga community for their resilience and determination. pic.twitter.com/Xhn9xslPFi
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2023