Breaking News

परकीय चलन साठ्यात वाढ सुरूच

भारताचा परकीय चलन साठा ३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ४.६७२ अब्ज डॉलरने वाढून ५९०.७८३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी, २७ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.५८ अब्ज डॉलरने वाढून ५८६.११ अब्ज डॉलरझाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा ६४५ अब्ज डॉलर इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. पण गेल्या वर्षी, जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावादरम्यान आरबीआयने रुपयाची घसरण थांबवण्यासाठी या फॉरेक्स रिझर्व्हचा वापर केला होता, ज्यामुळे तो कमी झाला.

या वर्षी १४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याने पुन्हा एकदा ६०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्या आठवड्यात साठा १२.७४ अब्ज डॉलरने वाढून ६०९.०२ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.

रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता ४.३९२ अब्ज डॉलरने वाढली आहे. परकीय चलन मालमत्ता परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग बनतात. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमधील चढउतारांचे परिणाम देखील समाविष्ट असतात. गोल्ड रिझर्व्ह २०० दशलक्षने वाढून ४६.१२३ अब्ज डॉलर झाले.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, देशाचे स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) ६४ दशलक्ष डॉलरने वाढून १७.९७५ अब्ज डॉलर झाले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताचा चलन साठा १६ दशलक्ष डॉलरने वाढून ४.७८९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *