Breaking News

“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले

लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक निकाल लागतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात जनतेने कौल देत भरघोस मतदान करत भाजपाला एकहाती सत्ता दिल्याचे चित्र आज दिसून आले.

साधारणतः पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात खरी लढत ही काँग्रेस आणि के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस आणि काँग्रेसमध्येच होणार असून भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असेल असे वक्तव्य केले होते. त्यानुसार तेलंगणाच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर भाजपाला अवघ्या ५ ते ६ जागा मिळाल्याचे दिसून आल्याने राहुल गांधी याचे ते वक्तव्य खरे ठरल्याचे दिसून आले.

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. पहिल्या पाच फेऱ्यांमध्येच तीन राज्यात अर्थात राजस्थान, मध्य प्रदेश मध्ये भाजपाला तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमेदवारांना मताधिक्क मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले. तर साधारणतः सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस आणि भाजपामध्ये आलटून-पालटून आघाडी मिळत होती. त्यामुळे राजस्थानात काँग्रेस सत्ता राखते की भाजपाला सत्ता मिळणार, मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौव्हान यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सत्ता मिळविण्यात यश मिळणार का अशी उत्सुकता निर्माण झाली. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने ११ वाजल्यानंतर आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि ती मतमोजणीची शेवटची फेरी पार पडे पर्यंत टिकवून ठेवली.
त्यामुळे तेलंगणामध्ये राहुल गांधी यांच्या विधानानुसार काँग्रेसला तेथील सत्ता मिळाली. तर भाजपाला अवघ्या ४ ते ५ जागा मिळवित तिसऱ्या स्थानी रहावे लागले.

तोपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील सत्ता भाजपाकडे सोपविण्याचा जनादेश या तीन्ही राज्यातील जनतेने घेतल्याचे मतमोजणीचे निकाल जसजसे जाहिर होऊ लागले. तसतसे स्पष्ट होऊ लागले. त्यामुळे हिंदूत्ववादी भूमिका मांडणाऱ्या भाजपाच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट होऊ लागले. दुपारनंतर तर भाजपाच्या इतिहासात मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत मध्ये १६२ जागी विजय मिळवित इतिहास घडवून आणला. या विजयामुळे आतापर्यंत तीन ते पाच वेळा मुख्यमंत्री पदी राहिलेल्या शिवराज सिंग चौव्हाण यांना भाजपाकडून यंदा लांब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने भाजपाला कौल दिल्याने पुन्हा एकदा शिवराज सिंग चौव्हान यांनाच मुख्यमंत्री पदाची सुत्रे भाजपाकडून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

राजस्थान राज्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षांतर्गत सचिन पायलट यांना डावलत आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाला नाकारत राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. दर निवडणूकीत राजस्थानातील जनता आलटून पालटून भाजपा आणि काँग्रेसला सत्ता देत असते. मात्र अशोक गेहलोत यांनी ही परंपरा मोडीत काढणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या. याशिवाय भाजपाने ही माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राज्यातील प्रचारात कोठे पुढे आणले नाही. तरीही भाजपाने काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या सलग मुख्यमंत्री पदी राहण्याच्या अटकळींना धुळीला मिळवित राज्यातील जनतेने परंपरा कायम राखली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलेल्या कामाची दखल सुरुवातीला राज्यातील जनतेने घेत तेथे पुन्हा एकदा भूपेश बघेल यांच्या सरकारला पुन्हा संधी द्यायचा निर्णय जवळपास घेतला होता. परंतु महादेव अॅपवरून भाजपाने सुरु केलेल्या आक्रमक राजकिय आकांड तांडावात आणि बघेल यांनी ५०० कोटी रूपयांची लाच घेतल्याच्या आरोपात तथ्य नसताना तेथील जनतेने काँग्रेसपेक्षा भाजपाच्या पारड्यात भरघोस मतांचे दान टाकत सत्तेची सुत्रे भाजपाच्या हाती सोपविली.

तेलंगणातील निवडणूकीबाबत मात्र प्रत्यक्ष लढत सुरुवातीला बीआरएस विरूध्द भाजपा अशी लढत करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. परंतु खरी लढत काँग्रेस आणि बीआरएस या दोन पक्षातच होणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच भाकित करत या निवडणूकीत भाजपा कुठेच दिसत नसल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानुसार तेलंगणातील जनतेने भाजपा आणि असादुद्दीन औवेसी यांच्यापेक्षा काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान टाकत एकहाती सत्ता दिली.

या निवडणूकीचे वैशिष्टे म्हणजे राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांरवार सभा होऊनही भाजपाऐवजी काँग्रेसच्या बाजूने राजकिय वातावरण होते. तीच परिस्थिती छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही होती. त्यामुळे भाजपाचे अनेक नेते ही तीन राज्ये मिळणार नाहीत अशीच अटकळ बांधून होती. त्यामुळे या तीन्ही राज्यात भाजपाच्या एकाही नेत्याकडून विजयाचा दावा करण्यात येत नव्हता. इतकेच नव्हे तर भाजपाचे चाणक्य अमित शाह यांच्या एका रॅलीत काँग्रेसच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजपाचा यंदा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र अखेरच्या दिवसात असे काय झाले की, काँग्रेसचे बाजूने असलेलं सगळं वातावरण भाजपाच्या बाजूने फिरले आणि या तिन्ही राज्यांची सुत्रे पुन्हा भाजपाच्या हाती गेली. त्यामुळे या शेवटच्या दिवसात या पत्ता भल्या भल्या राजकिय पंडीतांना लागेनासा झाला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *