राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची तयारी सुरु केली. त्याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज आजच भरणार आहेत. तर महाराष्ट्रातून माजी आमदार चंद्रकांत हंडारे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.
राज्यसभेच्या ५६ रिक्त जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानुसार आज आणि उद्याचा दिवस अर्ज सादर करण्याची मुदत आहे. राजस्थानमधून सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोनिया गांधी या पहिल्यांद्याच राज्यसभेच्या निवडणूकीत उतरणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांनी आजच उमेदवारी अर्ज आजच भरण्यासाठी प्रियंका गांधी-वड्रा, आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय हिमाचल प्रदेशातून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी, तर बिहारमधून डॉ अभिषेक प्रसाद सिंग यांना उमेदवारी काँग्रेसकडून आज जाहिर करण्यात आली आहे.
तर मुंबईतील दलित चळवळीची पार्श्वभूमी असलेले माजी मंत्री तथा आमदार चंद्रकांत हंडोरे यांना मागील वेळी विधान परिषदेसाठी उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडीमधील त्यावेळच्या सर्व आमदारांनी त्यांना पहिल्या पसंतीची सर्वांधिक मते दिली. परंतु दुसऱ्या पसंतीची मते देण्यात हात मात्र आकडता घेतला. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार गतवेळची चूक सुधारणार का आणि चंद्रकांत हंडोरे या विजय निश्चित होणार का या प्रश्नाचे उत्तर काही दिवसातच मिळणार आहे.
देशात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणूकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची पहिली यादी जाहीर झाली असून,
महाराष्ट्रातून श्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. pic.twitter.com/ZfJBGij1Ci— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 14, 2024