Breaking News

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या विद्यापीठांच्या यादित भारतातील सर्वोच्च विद्यापीठांनी जागतिक स्तरावर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. आयआयएम सारख्या केंद्र सरकारच्या संस्थांचा समावेश जगभरातील २५ विद्यापीठांमध्ये करण्यात आला आहे.

QS ने जागितक विद्यापीठांची यादी जाहिर केली असून यामध्ये अहमदाबाद, बंगलोर आणि कलकत्ता येथील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) ने व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक स्तरावर पहिल्या ५० विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. तर IIM-अहमदाबाद, या संस्थेचा समावेश जगभरातील टॉप २५ संस्थांमध्ये समावेश कऱण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ने या विषयाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर पहिल्या २० व्या यादीत स्थान मिळवले आहे. या विद्यापाठावर केंद्रातील भाजपा प्रणित विद्यार्थी संघटनेकडून तेथील विद्यार्थी निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी जंगजंग पछाडले होते. याशिवाय विकासत्मक अभ्यासातील उत्कृष्टतेसाठी भारताची प्रतिष्ठा आणखी मजबूत केली आहे. यामुळे QS क्रमवारीनुसार JNU भारतातील सर्वोच्च दर्जाचे विद्यापीठ बनले आहे.

चेन्नई येथील सविथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसने देखील मान्यता प्राप्त केली आहे, तिच्या दंतचिकित्सा कार्यक्रमासाठी जागतिक स्तरावर २४ व्या क्रमांकावर आहे.

“भारत आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, प्रवेश आणि जागतिक स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी योग्य दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे,” असे QS CEO जेसिका टर्नर यांनी सांगितले. “आव्हानांचा सामना करूनही, देश आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समुदायात निर्विवादपणे एक मजबूत खेळाडू बनत आहे.”

नवीनतम रँकिंग भारताच्या वाढत्या संशोधन क्षमता दर्शविते, प्रति पेपर निर्देशक उदाहरणांमध्ये २०% सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क मेट्रिकमध्ये १६% वाढ. तथापि, प्रीमियर जागतिक जर्नल्समध्ये प्रभावी संशोधन प्रकाशित करण्यात देश अजूनही आपल्या बरोबरीच्या देशांपेक्षा मागे असल्याचे सांगण्यात आले आहे.

QS चे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन सॉटर म्हणाले, “उच्च-गुणवत्तेचे, प्रभावी संशोधन आणि त्याचा शैक्षणिक समुदायामध्ये प्रसार करणे हे भारतासाठी आवश्यक पुढचे पाऊल आहे, असे मतही यावेळी व्यक्त केली.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *