Breaking News

हायब्रिड स्किल विद्यापीठ म्हणजे काय रे भाऊ, राज्य मंत्रिमंडळाची तर मान्यता

राज्यात मोठ्या तोऱ्यात हायब्रिड स्किल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस-पवार यांच्या राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. तसेच त्यासाठी महाप्रीत या आणखी एका संस्थेची स्थापना करत महाप्रीतच्या माध्यमातून या विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. मात्र यासंदर्भात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भात थेट राज्य सरकारला सवाल करत या विद्यापीठाची रूपरेखा काय असा सवाल केल्याची कागदपत्रे “मराठी ई-बातम्या.कॉम (www.marathiebatmya.com)” संकेतस्थळाच्या हाती आली आहेत.

देशभरात लोकसभा निवडणूका ठरलेल्या नियोजित वेळेत जाहिर होतील. मात्र कदाचीत विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका जाहिर होण्याची शक्यता गृहीत धरून मार्च २०२४ च्या महिन्याच्या अखेरच्या काही दिवसात महाप्रीत मार्फत हायब्रिड स्किल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर हायब्रिड स्किल विद्यापीठाला ठाणे महापालिकेच्या हद्दीतील जमिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे सदर जागेचा प्रस्ताव पाठविण्याआधी या विद्यापीठाचा प्रस्ताव परस्पर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. मात्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या प्रस्तावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यावर या विद्यापीठाची संरचना काय असणार, तसेच विद्यापीठासाठी किती जागेचा वापर होणार, तिथे किती विद्यार्थी आणि कुठले विद्यार्थी प्रशिक्षण घेणार, किती विषय शिकविणार, त्यासाठी किती प्राधापकांची नियुक्ती करणार, त्याची पात्रता काय असणार, बाहेर गावच्या (अर्थात जिल्ह्याबाहेरील) आणि परदेशातील विद्यार्थी तेथे शिक्षणास प्रवेश मिळणार का यासह अनेक प्रश्न उपस्थित करत या सर्व गोष्टींबाबतची माहिती उच्च व तंत्रनिकेतन विभागाने राज्य सरकारलाच विचारली आहे. तसेच या सर्व गोष्टींची माहिती दिल्याशिवाय पुढील कोणताही निर्णय देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेला अभिप्राय खालील प्रमाणे…
The file contains no details about the proposed university including premises, curriculum, type of learning, research area, number of faculty, student etc, it is not clear if mahaprit has mandate to set up and run up skill university and their capacity to manage an educational institution. without this details the department can not give opinion about the proposal.

त्यामुळे राज्य सरकारला आता हायब्रिड स्किल विद्यापाठीचा प्रस्ताव नव्याने सर्व गोष्टींच्या सविस्तर तपशीलासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नव्याने सादर करावा लागणार आहे. वास्तविक पाहता हायब्रिड स्किल विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव ज्या विभागाकडून सादर करण्यात आला त्या मंत्र्याला तशा पध्दतीचा प्रस्तावच सादर करण्याचे अधिकार नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *