Breaking News

Tag Archives: thane municipal corporation

आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही दोन दिवसात अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करणार

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा-कोपर येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… की गरीब माणसं फक्त मरण्यासाठी जन्माला येतात? छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल

कोपर-कळवा रुग्णालयात कालपासून तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच मनसे नेते अभिजित जाधव व ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र …

Read More »

शरद पवार यांची ठाणे महापालिका हॉस्पीटल प्रशासनाला कानपिचक्या ५ मृत्यूच्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग न येणं दुर्दैवी

ठाणे शहर हे तसे पाह्यला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणती विकास कामे व्हावी आणि कोणती प्रलंबित ठेवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनेच होत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेवरही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचीच सत्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी येथील महापालिका रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू …

Read More »

ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित

उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे कल्पिता पिंपळे यांनी केली ही मागणी चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी अनधिकृत फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सध्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन केला, त्यावेळी कल्पिता पिंपळे यांनी हल्लेखोरास कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ताई, तुमच्या बहादुरीचे …

Read More »

संपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे

क्लस्टरचा रिडेव्हलेपमेंट अर्थात समुह पुर्नविकासाचे धोरण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. समुह पुर्नविकासासंतर्गत जुन्या मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा एकत्रितरित्या पुर्नविकास करणे सहजशक्य होणार आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगले हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क असून ठाणेकरांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य शासनाने आणि राज्याच्या …

Read More »

या तीन महानगरपालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि फरकही मिळणार ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर नगरपालिकेला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर नगरपालिका या यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे व  किमान वेतनाचा फरक देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दुरदृश्य प्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.  यामध्ये डॉ.गोऱ्हे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तात्काळ देण्यात यावा. तसेच सामाजिक …

Read More »

१९ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढविला ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी ठाणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी २ ते १२ तारखेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र या कालावधीतही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १२ तारखेपासून १९ जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला असून यासंदर्भातील आज आदेशही जारी केले. मागील काही दिवसांपासून …

Read More »

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांसाठी रूग्णालय- बेड हवय, मग एक क्लीक करा महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे: प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आले आहे. शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि …

Read More »

लॉकडाउनमध्ये भटकणाऱ्या दुचाकीस्वाराची कर्मचारी महिलेला धडक महिला रूग्णालयात दाखल तर स्वार पळून जाण्यात यशस्वी

ठाणे: प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला एका बाईक स्वाराने जोरदार धड़क दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जख्मी झाली आहे, ठाण्याच्या पोखरण नंबर २ रस्त्यावर रोज प्रमाणे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर या रस्ते सफाईचे काम करत होत्या, लॉक डाउन असताना एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला …

Read More »