Breaking News

Tag Archives: rajesh tope

जयंत पाटील यांचा खुलासा, सोबत फोटो आहे म्हणून दगडफेकीला प्रोत्साहन दिले…

बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचारातील आरोपीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भातील फोटो भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत बीडमधील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमागे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याचा आरोप करत फोटो ट्विट केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत …

Read More »

निजाम काळातील मराठा कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दखल शासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पुर्वजांच्या निजामकाळातील महसूली नोंदी तपासून त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी असे प्रमाणपत्र देण्यात येईल. सचिव महसूल यांची या पुर्वीच नियुक्त समितीच्या मदतीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य …

Read More »

शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला

राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णयः कोरोना काळातील खटले मागे राज्य सरकारचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आले होते. मात्र अनेक नागरीकांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक नागरीकांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे या काळात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने आज घेतला. मुख्यमंत्री …

Read More »

राज्याचे नवे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर मंत्री राजेश टोपे यांची माहिती

वेगाने बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणीवर्धन” धोरण राज्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी काल शासन निर्णय निर्गमित करून राज्याचे कौशल्य श्रेणीवर्धन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” आवाहनानंतर मंत्री अस्लम शेख यांचा निर्बंधाबाबत मोठा इशारा पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नियमात शिथिलता आणत निर्बंधमुक्त केले. त्यास आता जवळपास दोन-तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले. आता त्यापाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री तथा …

Read More »

राज्यात कोरोनाबाधित ४ हजार तर मुंबईत ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण ३२ मृतांची नोंद तर १२ हजार ९८६ बरे होवू घरी

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत आजही घट आढळून आली असून आज ४ हजार ३५९ इतके रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण ६३ बाधितांचा मृत्यू तर राज्यात ५ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ …

Read More »

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. …

Read More »

पहिल्यांदाच १० हजाराखाली कोरोनाबाधित: ओमायक्रॉन एकही नाही २५ हजार बरे होवून घरी तर ६६ जणांचा मृत्यूची नोंद

मराठी ई-बातम्या टीम मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मागील एक आठवड्यापासून सातत्याने कमी नोंदविली जात होती. आजची चांगली बातमी म्हणजे आज चक्क ९ हजार ६६६ इतके बाधित अर्थात १० हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहेत. तर आज सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. दिवसभरात …

Read More »