Breaking News

शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला

राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी भाषण करताना अशा कोणत्याही घटनांचा उल्लेख त्यांनी न करता २०२४ ला आपण पुन्हा परत येणार असल्याचे जाहिरपणे सांगितले. यावरून पंतप्रधानांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतल्याचे दिसतेय असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते औरंगाबाद येथे पोहोचल्यानंतर आज पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी शरद पवार यांनी बोलताना टोला लगावला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा दिल्याप्रमाणे ते आले पण खालच्या पदावर आले. त्यामुळे २०२४ ला कशासाठी पुन्हा येणार काय दाखविणार यावर पंतप्रधानांनी कोणतेही भाष्य केले नसल्याचे मत मांडले. वास्तविक पाहता मणिपूरमध्ये हिंसाचाराची घटना महत्वाची आहे. त्या राज्याला लागून चीनची सीमा आहे. तसेच देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ते राज्य महत्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तेथे जावून लोकांना भेटणे, तेथील लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आदी गोष्टी महत्वाच्या होत्या. पण पंतप्रधानांना तेथे जाणे महत्वाचे वाटत नसल्यानेच ते अद्याप गेले नसल्याची टीकाही केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षांचे प्रतिनिधी तिथे गेले. लोकांशी ते बोलले. तेथील हिंसाचाराची दाहकता समजून घेतली. तेथील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधानांना करता आले असते. पण त्यांनी केले नसल्याचा आरोपही केला.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार आणि त्यांच्या भेटीबाबत विचारले असता आणि सध्या चर्चा असलेल्या ऑफरबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, आमची चोरडिया यांच्या घरी भेट झाली नाही असे म्हणता येणार नाही. पण मी घरातील वडिलधारी व्यक्ती असल्याने ती भेट कौटुंबिक होती. तसेच सध्या चर्चा भरपूर आहेत. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले.

तसेच ऑफरबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. तसेच माझ्याशी कोण चर्चा करणार असा प्रतिसवाल करत भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचा पुर्नरूच्चार केला.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *