Breaking News

Tag Archives: औरंगाबाद

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, … चुका मान्य करता, मग गुन्हा दाखल का केला नाही?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील …

Read More »

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासाठी कोणत्या कायद्याचा आधार ? प्रस्ताव तयार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० दिवसांनी फाईलीवर सही केली

मागील काही वर्षांमध्ये देशातील अनेक स्थळांचे आणि ठिकाणांची नावे भाजपा सरकारांनी किंवा केंद्र सरकारने बदलल्याचे पाह्यले. पण शहर, शहरांतर्गत आणि जिल्ह्याची नावे बदलण्यासाठी कोणत्या कायद्याचा आधार घेतला जातो. परंतु शहराचे नामांतर करायचे असेल तर नियम वेगळे आहेत आणि जिल्ह्याचे नामांतर करायचे असेल तर त्याचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे शहर आणि …

Read More »

अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा …

Read More »

शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला

राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …

Read More »

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, अंबादास दानवे आणि मंत्री भुमरे आणि सत्तार भिडले पालकमत्री म्हणजे जहागीरी आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे!घाबरणार नाही तर नडणार …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबाला शिव्या का घालता आधी जयचंदला द्या औरंगजेबा राज्य का आलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच सांगून ठेवलंय

मागील काही दिवसांपासून औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून ठिकठिकाणी वाद निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील राजकिय वातावरण तापले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद येथील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देत त्याच्या मजारवर फुलेही वाहीली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबरीला भेट दिल्यानंतर …

Read More »

छत्रपती संभाजी नगर नव्हे तर आता औरंगाबादच, उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडूनही आदेश जारी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद …

Read More »