Breaking News

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआय़एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल यांच्यासोबत होणार आहे.

राज्यातील मुळ शिवसेना आणि मुळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर या चारही पक्षांना लोकसभा निवडणूकीसाठी सातत्याने नवनवीन चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागला. परंतु या चारही पक्षांना अनेक नवे चेहरे मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यमान राज्य मंत्रिमंडळातील चेहऱ्यांना किंवा विद्यमान आमदारांनाच खासदारकीची उमेदवारी जाहिर करावी लागल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.

या सगळ्या उमेदवारीच्या स्पर्धेत अनेक सक्षम नसलेल्या उमेदवारांना या चार पक्षांकडून उमेदवारी देणे भाग पडले असल्याचे दिसून येत आहे. मात्र यातील मुळ पक्षात ज्या अदृष्य शक्तींनी महत्वाची भूमिका बजावली नेमक्या त्याच अदृष्य शक्तीच्या विरोधात सध्याचे जनमत आहे. त्यामुळे त्याचा फटका त्या अदृष्य शक्ती पुरस्कृत पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे शिवसेना उबाठा गटाने जाहिर केलेले उमेदवार चंद्रकांत खैरे, त्याचबरोबर एमआयएमचे विद्यमान खासदार आणि इम्तियाज जलिल हे दोघे तसे तयारीचे आहेत. मात्र यावेळी शिवसेना उबाठा गटाने हिंदू-मुस्लिम या नेहमीच्या फॉर्म्युल्याचा वापर न करता महाविकास आघाडीसोबत असल्याने सध्या समतोल भूमिका स्विकारली आहे. त्यामुळे या नव्या भूमिकेचा फायदा नेमका कोणाला होणार यावरून चर्चा सध्या सुरु आहे. मात्र संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून संदीपान भूमरे यांचा दारूण पराभव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *