Breaking News

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे -देवेंद्र फडणवीस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. या मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जवळपास १३ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत नवीनच मुद्दा पुढे आला. त्यातच भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर प्रत्यारोप केला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही याची चर्चा आताच सुरु झाली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे दक्षिण मध्यचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी तयार करण्याची हमी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. तशी चर्चाही मातोश्रीवर माझ्यासोबत केली. मात्र अहो आदित्य अजून लहान आहे तो आता कुठे तरी आमदारकीची नीट तयारी करतोय त्याच्या डोक्यात भलतेच काही घालू नका असे सांगितले.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, मी लवकरच वर जाणार आहे. त्यामुळे राज्यातील दुसरा मुख्यमंत्री पदाचा सशक्त उमेदवार असायला हवा. त्यामुळे त्याला आतापासूनच तयार करतो असे सांगितल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आश्वासन अमित शाह यांनीच स्वतः दिल्याचे आणि तशी चर्चा मातोश्रीवर अमित शाह यांच्यासोबत झाल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

तर दुसऱ्याबाजूला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री पदासाठी मी आदित्य ठाकरे यांना तयार करतो असे कधी म्हणालो असे सांगत इतक्या दिवस माझे मित्र उद्धव ठाकरे यांनी आधी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवायचाय म्हणत एकप्रकारचा भ्रम निर्माण केला. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर स्वतःला बसविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. आता ते म्हणतायत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी मी तयार करण्याची जबाबदारी घेतोय म्हणून. अहो उद्धव ठाकरे तुमचा नेमका कोणता भ्रम आहे, तो भ्रम बाहेर आला, आता मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही आदित्य ठाकरे याचे नाव पुढे करताय आणि तशी हमी कोणी घेतली अमित शाह यांनी घेतली की, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असा खोचक सवालही यावेळी उपस्थित केला.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी तयार करण्याची चर्चा मातोश्रीच्या कोणत्या खोलीत झाली असा सवालही केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, तीच खोली आहे ज्या खोलीत तुमचे नेते अमित शाह हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेण्यासाठी येत आणि शिवसेनेसोबतची चर्चा करण्यासाठीही त्याच खोलीत बसत असे सांगत आमच्याकडे वेगवेगळ्या खोल्या नाहीत. कदाचीत तुमच्याकडे वेगवेगळ्या खोल्यात बसून चर्चा करण्याची पध्दत असेल असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *