Breaking News

ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलत त्यांच्या मुलाला दिली उमेदवारी

महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलून त्यांचा मुलगा करण याला उमेदवारी दिली. करण भूषण सिंग हा ब्रिजभूषण सिंग यांचा धाकटा मुलगा आहे, ज्यांनी सलग तीन वेळा उत्तर प्रदेशची जागा जिंकली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण कैसरगंजमधून दोन लाख मतांनी विजयी झाले होते. करण भूषण सिंग हे सध्या उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते गोंडा येथील नवाबगंज येथील सहकारी ग्राम विकास बँकेचे अध्यक्षही आहेत.

कैसरगंजमधून आपल्या मुलाच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना ब्रिज भूषण म्हणाले की मी भाजपाच्या निर्णयावर आनंदी आहे. “पक्ष माझ्या वर आहे. मी पक्षापेक्षा मोठा नाही. मी पक्षाच्या निर्णयावर खूश आहे आणि जनताही खूश आहे,” असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ब्रिजभूषण शरणसिंग यांना त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याबाबत विचारले असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

भाजपा ब्रिजभूषण शरण सिंग यांना लोकसभा निवडणूकीत उमेदवारी देणार नसल्याचे आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार कैसरगंज जागेवर भाजपा नेतृत्वाने ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली होती. सुमारे दशकभर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिलेल्या भाजप खासदारावर सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांसारख्या अव्वल भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण विरुद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर अनेक आठवडे जोरदार निदर्शने केली होती. कुस्तीपटूंच्या विरोधानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१९ च्या निवडणुकीत ब्रिजभूषण कैसरगंज मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले. आता भाजपने त्यांच्या मुलाला या जागेवरून उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कैसरगंजमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *