Breaking News

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, अंबादास दानवे आणि मंत्री भुमरे आणि सत्तार भिडले पालकमत्री म्हणजे जहागीरी आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले.

ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आमदार राजपूत आणि अंबादास दानवे सत्तार-भुमरे जोडगोळीवर तुटून पडले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार असे संकेत होते. अगदी तशीच वादळी बैठक झाली. निधीवाटपावरून जसा अधिवेशनात गदारोळ झाला तसाच गदारोळ नियोजन समितीच्या बैठकीतही झाला.

ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याची तक्रार केली. यावरून भडकलेल्या पालकमंत्री भुमरेंनी आणि अब्दुल सत्तारांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनवायला सुरूवात केली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी रौद्ररूप धारण करत आपल्या खुर्चीवरून उठून भुमरे-सत्तारांवर तुटून पडले. उभय नेत्यांमधला हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत गेला.

ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्याला लेखी कळवण्यात येईल असं म्हटलं. मात्र, त्यानंतरही आमदार राजपूत यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालकमंत्री यांनी त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. त्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली”

Check Also

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *