Breaking News

अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने औरंगाबाद, उस्मानाद जिल्ह्याचे, तालुक्यांचे आणि विभागीय नामांतर करण्याचा निर्णय घेत शासकिय राजपत्र आज जारी करण्यात आले.

वास्तविक पाहता राज्य सरकारकडून केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नावं अनुक्रमे बदलण्याचा निर्णय घेत त्यानुसार नामांतर केले. मात्र जिल्हा, तालुका आणि विभागीय नावाची प्रक्रिया अर्धवट राहिली होती. त्यातच औरंगाबाद शहराच्या नामांतरप्रश्नी एक रहिवाशांने मुंबई न्यायालयाचा दर्जा ठोठावला होता. त्यावर नामांतराची प्रक्रिया अर्धवट असल्याने रहिवाशाच्या मागणीनुसार अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते.

परंतु राज्य सरकारने नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक औरंगाबाद शहरात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतरबरोबरच तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे करण्याचा निर्णय घेत तसा निर्णय राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला.

या दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री सही केली आणि त्यानंतर यासंदर्भातील नामांतर करण्यात आल्याचा निर्णय राजपत्राद्वारे आज शनिवारी १६ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिर करण्यात आला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *