Breaking News

Tag Archives: deputy chief minister

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रायगड …

Read More »

बारामतीत १०० खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रास राज्य सरकारची मान्यता

बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक (आरोग्य प्रशिक्षण केंद्र) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी ७७ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर

महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, बारामती राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार

मराठवाडा, विदर्भातील महारोजगार मेळाव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याचे आयोजन अहमदनगर नंतर बारामती येथे करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मागील अनेक …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, समृध्दीसाठी वर्षातच २४०० कोटी पुन्हा निविदा ?

राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना २०१४ साली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फायद्यात असणाऱ्या एसआरए आणि म्हाडाच्या ठेव रकमेतील पैशांचा आणि बँकांकडून ५० हजार कोटींचे कर्ज उभारत मुंबई ते नागपूर असा ८०० किमीहून अधिक लांब असलेल्या समृध्दी महामार्गाची उभारणी केली. तसेच या महामार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनी तत्कालीन नगरविकास …

Read More »

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आदेश

आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी ‘गट-अ’ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर अजित पवार स्पष्टोक्ती, सोडणार नाही कोणाला

नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्याखोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर याप्रकरणी मरिन लाईन्स पोलिस स्थानकात मुख्यमंत्री सचिवालयाने गुन्हाही दाखल केला. याप्रश्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार …

Read More »

शरद पवार यांची टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे विधान पोरकटपणाचे

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचा मुद्दा हरकतीच्या मुद्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावरून विधानसभा सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाह्यला मिळाला. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या मागे; जरांगेच्या आरोपाला राजकिय वास

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालल्याचे दिसू लागल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर येणार असल्याचा इशारा दिला. या आरोपावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाकडून सावध भूमिका व्यक्त केली. त्यानंतर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार …

Read More »