Breaking News

जयंत पाटील यांचा खुलासा, सोबत फोटो आहे म्हणून दगडफेकीला प्रोत्साहन दिले…

बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचारातील आरोपीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भातील फोटो भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत बीडमधील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमागे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याचा आरोप करत फोटो ट्विट केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत.

तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, हि बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी सदर आरोपीने शरद पवार यांच्याशिवाय इतर भाजपा नेत्यांसोबत काढलेले फोटो ट्विट करत म्हणाले, सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का ? असा सवालही उपस्थित केला.

दरम्यान, यासंदर्भात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी आणि देवेंद्र फडणवीस हे लोकांमध्ये सातत्याने जात असतो. त्यावेळी अनेक जण सोबत फोटो काढत असतो. ते फोटो काही आम्ही काढून घेत नसतो तर ते लोक काढून घेत असतो असे सांगत शरद पवार यांच्यासोबत आरोपीने काढलेला फोटो आपण पाहिला नसल्याने त्याबाबत आपण काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर जयंत पाटील यांनी त्या आरोपीचे इतर नेत्यांसोबत असलेले फोटो ट्विट करत आरोप करणाऱ्या नेत्यांचा भंडाफोड केला.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात फक्त ८ टक्के महिलांना उमेदवारी

देशात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. देशांतर्गत एकूण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *