Breaking News

गोव्यातील निवडणूक युतीबाबत शिवसेना प्रवक्ते राऊत यांनी दिले हे संकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील जागांबाबत उद्या अंतिम निर्णय

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी गोव्यातही भाजपाच्या विरोधात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोव्यात राष्ट्रवादी एकला चलो रेच्या विचारात असल्याचे जाहीर केले होते. मात्र शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील बोलणी उद्या अंतिम टप्यात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. १८ जानेवारीला जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल १८ जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करतील. फक्त त्यानंतर कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि गोव्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांची युती आहे. मात्र, या क्षणी काँग्रेसने राज्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या युतीत काँग्रेस नसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

योगीजींच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. त्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. अपर्णा यादव भाजपामध्ये जाणार असल्याचे मी ऐकले आहे. हे जाणून बरे वाटले  असेही ते म्हणाले.

आम्ही गोव्यात १०-१५ जागा लढवू, असे सांगत गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला होणार आहेत. १० मार्चला मतमोजणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान तृणमूल काँग्रेसबरोबरील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसची बोलणी फिस्कटली असल्याचे सांगण्यात येत असून काँग्रेसने यापूर्वीच गोव्यात प्रियंका गाधी यांची जाहिर सभा घेवून गोव्यात एकट्याने निवडणूकांना सामोरे जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग गोव्यात होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *