Breaking News

कालच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत १० हजाराने घट तर २९ हजार बरे होवून घरी २२ लाख ६४ हजारावर होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम

कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या रूग्णात चांगलीच घट झाल्याचे आढळून आले असून काल ४१ हजार रूग्ण आढळून आले होते. तर आज ३१ हजार १११ इतके रूग्ण आढळून आल्याने कालच्या तुलनेत १० हजार रूग्णांची कमी नोंद झाली आहे. तर सर्वात दिलासा दायक गोष्ट म्हणजे २९ हजार ९२ इतके रूग्ण आज बरे होवून घरी गेले आहेत. तर २२ लाख ६४ हजार रूग्ण २१७ रूग्ण होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत आज ५ हजार ९५६ म्हणजे जवळपास ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात ११ महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार असे मिळून मुंबई आणि ठाण्यात १२ हजार ८८५ इतके रूग्ण आढळून आले आहेत.

आज २९,०९२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे. तर राज्यात आज २४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२१,२४,८२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७२,४२,९२१ (१०.०४  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,६४,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात १२२ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८१ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने  आणि ४१ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  रिपोर्ट केले आहेत. आज सर्वाधिक रुग्ण पुणे मनपा – ४०, मीरा भाईंदर- २९, नागपूर-२६, औरंगाबाद- १४, अमरावती-७, मुंबई- ३, भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १ आढळून आला आहे.

. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५९५६ १००५१६५ १२ १६४६९
ठाणे ७२६ ११३३१३ २२४०
ठाणे मनपा १४५२ १७९३४७ २१२४
नवी मुंबई मनपा १२१२ १५२२७४ २०१९
कल्याण डोंबवली मनपा ७३९ १७०९१३ २८८३
उल्हासनगर मनपा २०२ २५२१३ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ७० १२७१६ ४८९
मीरा भाईंदर मनपा ३६१ ७३८४३ १२०८
पालघर १०४ ६१११२ १२३५
१० वसईविरार मनपा ३६६ ९५६१२ २१०७
११ रायगड ६७२ १२८९५२ ३३९३
१२ पनवेल मनपा १०२५ ९७५६६ १४४३
ठाणे मंडळ एकूण १२८८५ २११६०२६ १८ ३६२७३
१३ नाशिक ३९४ १६९६३० ३७६३
१४ नाशिक मनपा १२०६ २५२४६६ ४६६९
१५ मालेगाव मनपा ४८ १०४५४ ३३६
१६ अहमदनगर ५३५ २७७९४१ ५५३४
१७ अहमदनगर मनपा ३२८ ७१३८४ १६३६
१८ धुळे ३० २६५९३ ३६३
१९ धुळे मनपा ६४ २०६०२ २९४
२० जळगाव १७७ १०८४८६ २०५९
२१ जळगाव मनपा १३५ ३३७९० ६५८
२२ नंदूरबार २१९ ४०९३४ ९४८
नाशिक मंडळ एकूण ३१३६ १०१२२८० २०२६०
२३ पुणे १३५८ ३८६२६२ ७०५५
२४ पुणे मनपा ३९७१ ५८०७१७ ९३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२६९ २९३९४९ ३५३०
२६ सोलापूर २०४ १८०४८३ ४१४५
२७ सोलापूर मनपा १६४ ३४२६२ १४७५
२८ सातारा ७४१ २५९१५३ ६५११
पुणे मंडळ एकूण ८७०७ १७३४८२६ ३२०१९
२९ कोल्हापूर २०८ १५६८६० ४५४७
३० कोल्हापूर मनपा २६४ ५३८१२ १३०६
३१ सांगली २०० १६६४८९ ४२८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२३ ४७९७८ १३५३
३३ सिंधुदुर्ग १४९ ५४६०५ १४५३
३४ रत्नागिरी १३३ ८१३०० २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ११७७ ५६१०४४ १५४४०
३५ औरंगाबाद ७७ ६३६७० १९३६
३६ औरंगाबाद मनपा ३४४ ९७२५९ २३२९
३७ जालना १४५ ६१८१३ १२१८
३८ हिंगोली ४२ १८८१९ ५०८
३९ परभणी ३७ ३४६४८ ७९३
४० परभणी मनपा ६४ १८७८० ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ७०९ २९४९८९ ७२२७
४१ लातूर २२२ ७०५७५ १८०४
४२ लातूर मनपा १७० २५३९६ ६४५
४३ उस्मानाबाद १२८ ६९४३१ १९९२
४४ बीड १३४ १०४८९१ २८४४
४५ नांदेड १२१ ४७८३२ १६२६
४६ नांदेड मनपा २७४ ४६२३७ १०३४
लातूर मंडळ एकूण १०४९ ३६४३६२ ९९४५
४७ अकोला २६०४९ ६५५
४८ अकोला मनपा ११६ ३४८३१ ७७४
४९ अमरावती ५८ ५२८९३ ९८९
५० अमरावती मनपा ११४ ४४७१८ ६०९
५१ यवतमाळ ९४ ७७००९ १८००
५२ बुलढाणा १३० ८६३६४ ८१२
५३ वाशिम ७० ४२१४६ ६३७
अकोला मंडळ एकूण ५९१ ३६४०१० ६२७६
५४ नागपूर ४०६ १३२५२९ ३०७५
५५ नागपूर मनपा २०२३ ३७९०७७ ६०५५
५६ वर्धा ४४ ५८६३३ १२१८
५७ भंडारा ५३ ६०९४७ ११२४
५८ गोंदिया ९४ ४१७६० ५७२
५९ चंद्रपूर ६७ ६०४१७ १०८९
६० चंद्रपूर मनपा १०३ ३०५९६ ४७८
६१ गडचिरोली ६७ ३१२८१ ६७०
नागपूर एकूण २८५७ ७९५२४० १४२८१
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३११११ ७२४२९२१ २४ १४१८३२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *