Breaking News

आरोग्य

मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, इन्फ्लूएंझाग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करा वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी

इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा …

Read More »

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा, म.फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन वाढविली-विधानसभेत

महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या …

Read More »

लिक्विड ओरल उत्पादक कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवा विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांचे आदेश

राज्यात लिक्विड ओरल उत्पादक करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिले. औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न व औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही शिरसाट यांनी यावेळी दिल्या. विधानसभा सदस्य ॲड.आशिष शेलार, योगेश सागर, अजित पवार, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे …

Read More »

३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटींपेक्षा अधिक मदत निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटींपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे. जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत, ऑगस्ट – २७६ रुग्णांना …

Read More »

महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ: दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा …

Read More »

बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार या संस्था आणि व्यक्तींना जाहीर डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी

सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री …

Read More »

गिरिष महाजन म्हणाले, खरं तर बोगस डॉक्टरांना आपणच अलाऊन्स देतोय फक्त त्यांना दररोज पाचशेचा दंड ठोठावतो, कायदा बदल्याची आवश्यकता

मागील काही वर्षांमध्ये राज्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बन्सोड यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरिष महाजन म्हणाले, खरे तर आपण बोगस डॉक्टरांना आपणच अलॉऊन्स देतोय असे सांगत या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयामुळे असल्याचे स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे …

Read More »

इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणते भारतात चीनी कोरोना व्हेरियंटचे ४ रूग्ण पण काळजी करण्याचे कारण नाही

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान, फ्रांस, ब्राझील आदी देशांमध्ये २४ तासात ५.३७ लाख कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर भारतात नव्याने १४५ रूग्ण आढळून आले असून यापैकी ४ रूग्ण हे चीनी कोरोना व्हेरियंट BF-7 चे आढळून आले आहेत. चीनी व्हेरियटंचे रूग्ण आढळून आल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आले असून रूग्ण …

Read More »

गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर

गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले …

Read More »