Breaking News

Video: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ‘चॅट बॉट’ चे कान पिचक्या मात्र विरोधकांसह प्रशासनाला मोबाईल व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या८० पेक्षा अधिक सेवा सुविधांचे लाभ: २४ तास ही सुविधा उपलब्ध

मराठी ई-बातम्या टीम

गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील. आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु त्याला छेद देणारा आजचा उपक्रम असल्याचे सांगत पालिका प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचावर अप्रत्यक्ष भाष्य करत मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात असे सांगत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या सततच्या टीकेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टोला लगावला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत. या व्हॉट्सअॅपवर चॅट बोटचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का? याचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे. जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे. महापालिका आयुक्तांना सुचना, महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण. कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद. कौतूकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून करतो. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात असा उपरोधिक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.  माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने  मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर झाल्याची आठवण करून देत मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे वचन त्यांनी यावेळी महापालिकेला दिले.

Check Also

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *