Breaking News

निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना करुन काय उपयोग? भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम

निलंबन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या सुनावणीला आम्ही आज ६ आमदार १२ आमदारांच्यावतीने उपस्थिती राहिलो. आमचे निवेदन लेखी स्वरुपात आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हेही आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निंलबित करण्यात आले असून हे निलंबन अन्यायकारक असल्याने या विरोधात भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार आणि अन्य ११ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून ती प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी अपेक्षित आहे.

दरम्यान, आज या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानभवनात आपल्या कार्यालयात सुनावणी ठेवली होती. त्याला १२ आमदारांच्यावतीने ६ आमदार उपस्थितीत होते. यामध्ये आमदार अॅड आशिष शेलार, जयकुमार रावल, योगेश सागर, अॅड पराग अळवणी, नारायण कुचे, अभिमन्यू पवार आदींचा समावेश होता.

अॅड आशिष शेलार यांनी विधिमंडळाला दिलेले हेच ते पत्र:-

Check Also

लॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *