Breaking News

पटोलेंचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान, तोंड उघडाच मर्यादेत रहा च्या इशाऱ्यानंतर नाना पटोलेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम  

सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे तेही कळेल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबादेवीचे दर्शन घेवून पंतप्रधान मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांचे वक्तव्य आम्ही फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत त्यांना मर्यादेचा विसर पडतो. त्यामुळे त्यांनी मर्यादेतच रहावे असा इशारा पाटील यांनी दिला होता.

त्यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, त्यांनी तोंड उघडावे म्हणजे आम्हालाही कळेल की त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते असेही ते म्हणाले.

Check Also

लॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *