Breaking News

क्रेडिट कार्डचे बील थकलेय ? जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते या बँका आकारतात २ टक्के किंवा ५०० रूपयांचा दंड आकारणार

मराठी ई-बातम्या टीम

क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. खरेदी करताना तुम्हाला रोख पैसे   देण्याची गरज नसते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात. मात्र, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर न भरल्यास कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो. क्रेडिट   कार्डचे बील भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला बिलांवर अतिरिक्त रक्कम म्हणजेच विलंब शुल्क भरावे लागते. याशिवाय तुम्ही दिलेले चेक वटला नाही तर बँका आता एकूण देय रकमेच्या २% किंवा किमान ५०० रुपये आकारेल. कोणती बँक किती शुल्क आकारते ते  जाणून घेऊया.

 ICICI बँक

ICICI बँकेने एमराल्ड क्रेडिट कार्ड वगळता त्यांच्या सर्व क्रेडिट कार्डसाठी उशीरा पेमेंट शुल्क देखील बदलले आहे. उशीरा देय शुल्क एकूण देय रकमेनुसार बदलते. तुमची एकूण थकबाकी १०० रुपयांपेक्षा कमी असल्यास, बँक तुम्हाला कोणतेही शुल्क आकारणार नाही. तर ५०,००० किंवा त्याहून अधिक थकबाकीसाठी बँक जास्तीत जास्त १२०० रुपये आकारेल.

HDFC बँक, SBI कार्ड आणि Axis बँक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त शिल्लक पेमेंटवर १३०० रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहेत. या सर्व बँका बर्‍याच काळापासून शुल्क आकारत आहेत तर ICICI बँक १० फेब्रुवारी २०२२ पासून ५०,००० रुपये किंवा त्याहून अधिक उशीरा पेमेंटसाठी १२०० रुपये आकारणार आहे.

SBI क्रेडिट कार्ड शुल्क

SBI ५०० रुपयांपेक्षा कमी शुल्क आकारले जाणार नाही. तर ५०१-१००० रुपयां पर्यंतच्या बिलांवर ४०० रुपये, १,००१-१०,००० रुपयांपर्यंतचे विलंब शुल्क १३०० रुपये आहे. SBI क्रेडिट कार्डांवर २.५% रोख आगाऊ शुल्क आकारले जाईल. रोख काढण्याच्या रकमेवर ५०० रुपये किंवा २.५% यापैकी जे जास्त असेल तेवढे शुल्क आकारले जाईल. ओव्हरलिमिट चार्ज २.५ टक्के किंवा कमाल ६०० रुपये आहे. ऑटो डेबिट किंवा चेक रिटर्न शुल्क म्हणून किमान २% किंवा रु ५०० आकारले जातील.

HDFC क्रेडिट कार्ड शुल्क

HDFC कडून १०० रुपयांपेक्षा कमी बिलावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. १००-५०० रुपयांच्या बिलावर १०० रुपये विलंब शुल्क आकारले जाते. ५०१-५,००० रुपयांपर्यंतच्या बिलांवर ५०० रुपये, ५००१-१०,००० रुपयांसाठी ६०० रुपये विलंब शुल्क, १०००१-२५००० रुपयांच्या बिलांवर ८०० रुपये, २५००१-५०,००० रुपयांसाठी ११०० रुपये आकारले जातील. एचडीएफसी क्रेडिट कार्डवरील रोख आगाऊ शुल्क २.५% रोख रक्कम किंवा ५०० रुपये यापैकी जे जास्त असेल त्यावर आकारले जाईल. ओव्हरलिमिट चार्ज २.५ टक्के किंवा कमाल ५५० रुपये आहे. ऑटो डेबिट किंवा चेक रिटर्न चार्ज म्हणून किमान २% किंवा ४५० रुपये आकारले जातील.

अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड शुल्क

अॅक्सिस बँक ३०० रुपयांपेक्षा कमी बिलावर कोणतेही शुल्क आकारणार नाही. ३००-५०० रुपयांच्या बिलावर १०० रुपये विलंब शुल्क आकारले जाते. तर ५०१-१००० रुपयांपर्यंतच्या बिलांसाठी ५०० रुपये, १००१-१०,००० रुपयांच्या बिलासाठी विलंब शुल्क १००० रुपये आहे.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *