Breaking News

Tag Archives: sarathi

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, परिक्षा पुन्हा घ्या, महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी

महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा …

Read More »

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दरवर्षी ७५ विद्यार्थी जाणार परदेशी शिक्षणासाठी

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. …

Read More »

सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, ‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार

‘सारथी’च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याऱ्या ‘सारथी’ला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी …

Read More »

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर ! विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमाह ८००० रूपये विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपुर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतीम …

Read More »

खा. उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र केल्या या ६ मागण्या मराठा समाजाला मदत करण्याची विनंती

सातारा: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात असून याप्रश्नी ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करावी, सारथी या संस्थेसाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी यासह वसतीगृह शुल्काची रक्कम अदा करावी या प्रमुख मागणीसह राज्य सरकारसेवेसाठी निवड होवून ही त्यांना अद्याप सेवेत घेतले नसल्याने अशा …

Read More »

माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी …

Read More »

सामाजिक न्यायच्या निधीतून सारथीला ८ कोटी : काँग्रेसने मात्र संधी गमावली वित्त मंत्री अजित पवारांनी काँग्रेसला केले बीन महत्वाचे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातींसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या खर्च न झालेल्या निधीतील आठ कोटी रूपयांची रक्कम सारथीच्या स्थैर्यासाठी देण्यात आली. विषेश म्हणजे यासंबधीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी घेतला आणि लगेच त्याची प्रतीपूर्ती केली. राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाचे खाते नसल्याने काँग्रेसने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत मदत …

Read More »

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार आता अजित पवारांच्या विभागाखाली स्वायत्तता कायम राहणार तात्काळ ८ कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले. मात्र अखेर आज झालेल्या बैठकीत सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक मागास महामंडळाचा कारभार वित्त व नियोजन विभागापैकी नियोजन विभागाच्या खाली चालणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे …

Read More »