देशातील विमान क्षेत्रात होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) आता भरती मोहीम हाती घेतली असून ज्या जागांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यांचे महिन्याचे पगार लाखांच्या घरात आहेत.
ते किमान २ लाख ८२ हजार ते ९ लाख ३० हजारांच्या घरात आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, डीजीसीएमध्ये एकूण ६२ जागांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक, वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक, फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (विमान), फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) आदी पदांची भरती करण्यात येणार आहे.
यापैकी, उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक या पदाकरिता महिन्याला नऊ लाखांचा पगार देण्याचे जाहीर केले असून सर्वाधिक कमी पगार हा फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) या पदाकरिता आहे.
हा महिन्याला पगार २ लाख ८२ हजार इतका असेल. येत्या २३ ऑगस्टपासून ऑनलाईन प्रणालीद्वारे इच्छुकांना अर्ज करता येतील.