Breaking News

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य विभाग अर्थात ललित कला केंद्राकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्या परवानगीने रामायणातील आधारीत नाट्य सादर करण्यात येत होते. मात्र रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आणि दृष्य दाखविल्याच्या निषेधार्थ अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडत ललित कला केंद्राची तोडफोड केल्याची घटना आज घडली.

तत्पूर्वी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी डॉ प्रविण भोळे यांच्यासह ६ जणांना अटक केल्याची माहिती पुढे आली.

यासंदर्भात परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्याशी काही माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तीरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे काही संवाद होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना पोलिस उपायुक्त विजय मगर म्हणाले की, डॉ भोळे हे विभाग प्रमुख असून नाटक सादर करण्यापूर्वी किमान संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे सांगितले.

Check Also

वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *