Breaking News

पंजाब आणि चंदिगढचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा

काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात प्रशासनिक संघर्ष निर्माण झाला होता. यावरून भगवंत मान सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानेही भगवंत मान सरकारची बाजू उचलून धरत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगढ शहराच्या महापौर पदी अल्पमतातील भाजपाच्या नगरसेवकाची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. हे घटनात्मक प्रकरण राज्यपाल भवनावर शेकण्याची शक्यता दिसताच बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या राज्यपाल पदाचा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे पाठविल्याचे सांगितले.

बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे आणि काही पूर्वीच्या निर्धारीत गोष्टी (कमिटमेंट) मुळे आपण पंजाब राज्याच्या राज्यपाल पदाचा आणि चंदिगढच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. बनवारीलाल पुरोहित यांची पंजाब आणि चंदिगढच्या प्रशासक पदी २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या चंदिगढच्या महापौर पदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांचे प्राबल्य असताना तेथील निवडणूक आयोगाच्या सदस्याने चक्क अल्पमतातील भाजपाच्या उमेदवाराला महापौर म्हणून घोषित केले. विशेष म्हणजे यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओमध्ये निवडणूक आयोगाचा सदस्य स्वतःच मतपत्रिकेवर सह्या करत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. याप्रकरणी राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर काही तासांचा अवधी उलटत नाही तोच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *