Breaking News

जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेदूंची शस्त्रक्रियाः आता प्रकृत्तीत सुधारणा

आध्यात्मिक नेते तथा सद्गुरु जग्गी वासुदेव यांना मागील काही दिवसांपासून डोकेदुखीचा आणि फलटीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर अपोलो हॉस्पीटलमध्ये त्यांच्या मेंदूची तपासणी केला असता त्यांच्या मेंदूला सूज आल्याचे आणि डोक्यात रक्तस्वा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने मेदूंची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. अशी माहिती घोषणा ईशा फाऊंडेशनने बुधवारी केली. तसेच जग्गी वासुदेव हे ६६ वर्षीय असल्याची माहितीही दिली.

ईशा फाऊंडेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, सद्गुरूंना नुकतीच जीवघेणी वैद्यकीय परिस्थिती आली आहे. ते सध्या बरे होत आहेत. तीव्र डोकेदुखीमुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सद्गुरुंना मेंदूमध्ये अनेक रक्तस्त्राव झाला, असे निवेदनात म्हटले आहे. परिस्थिती बिघडल्याने, १७ मार्च रोजी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये डोक्याच्या कवटीत रक्तस्त्राव कमी करण्यासाठी त्याच्यावर मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले.

Check Also

वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *