Breaking News

बलुचसमर्थक ८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ग्वादर बंदरावर हल्ला

२० मार्च रोजी बलुच समर्थक आठ दहशतवाद्यांनी ग्वादर बंदरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना सुरक्षा दलांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तातडीने पाऊले उचलत दहशतवाद्यांना प्रतिकार केला. त्यात या ८ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांनी सांगितले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेक्यांनी ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलात घुसून गोळीबार केला तर परिसरात अनेक स्फोटही करण्यात आले. सुरक्षा दलांनी हा हल्ला अयशस्वी केला आणि आठ हल्लेखोरांना ठार केले. पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोरांना प्रतिकार केल्याचे वृत्त द हिंदू या वर्तमान पत्राने एक्सप्रेस ट्रिब्युनच्या हवाल्याने दिले.

ग्वादर बंदरावर हल्ला केल्यानंतर आठ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्थान घातल्यानंतर प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या मजीद ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासून हिंसक बंडखोरी सुरू आहे. बलुच बंडखोर गटांनी यापूर्वी USD 60 अब्ज चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांना लक्ष्य करून अनेक हल्ले करण्यात येत आहेत.

सीपीईसी पाईपलाईन उभारणीच्या कामासाठी हजारो चिनी कर्मचारी पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. फुटीरतावादी BLA बलुचिस्तानमध्ये चीनच्या गुंतवणुकीला विरोध असून चीन आणि पाकिस्तानवर संसाधनांनी समृद्ध प्रांताचे शोषण केल्याचा आरोप दहशतवादी गटाकडून करण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार सीमापार दहशतवादाची कोणतीही कृत्ये खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज, थिंक टँकने जारी केलेल्या वार्षिक सुरक्षा अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये ७८९ दहशतवादी हल्ले आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये १,५२४ हिंसाचार-संबंधित मृत्यू आणि १,४६३ जखमी झाले आहेत – हा सहा वर्षांचा उच्च विक्रम आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *