Breaking News

गंगा नदीत आंघोळीला निघालेल्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने मृत्यू

कासगंज रस्त्याने गंगा नदीत आंघोंळ करण्यासाठी ३० ते ४० जणांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ७ लहान मुलांसह ८ महिलांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरचा अपघात एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज रस्त्यावरील दरियावगंज-पतियाली रस्त्यावरील पतियाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत सदरची घटना आज सकाळी घडली.

सदर ट्रॅक्टर ट्रॉलीत १५ ते २० नागरिक होते. यात १५ जण प्रौढ तर ७ लहान मुलांचा समावेश होता. परंतु तलावाजवळून जाताना ट्रॅक्टर ट्रॉली व्यक्तींच्या वजनाने आणि पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना एका बाजूला कलल्याने ७ ते ८ फुट खोल असलेल्या तलावात थेट कोसळून ट्रॉलीतील १५ जणांचा यात ७ लहान मुले आणि ८ महिलांचा मृत्यू झाला तर आणखी १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

तसेच टॅक्टर ट्रॉलीने एकूण २० ते ३० जण यात ८ महिला आणि ७ मुलं प्रवास करत होती. तसेच १५ ते २० व्यक्ती जखमी झाली असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

सदर अपघातातील प्रवासी हे इटावा जिल्ह्यातील जयथारा येथून गंगा नदीत आंघोळ करण्यासाठी निघाले होते. रस्त्यात समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हर टेक करताना सदरचा अपघात झाला आहे. तसेच संबधित मृतांच्या शवविच्छेदन झाल्यानंतर मृतकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहिर केली असून सदर घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *