Breaking News

काँग्रेस- आम आदमी पार्टी जागा वाटपावर शिक्कामोर्तब; दिल्लीत सोबत, पंजाबात…

एकाबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला इंडिया आघाडीतील सहभागी राजकिय पक्षांशी रखडलेल्या जागा वाटपाची चर्चाही आता पुर्णत्वास येत आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीशी जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आज दिल्लीतील आम आदमी पक्षाशी चर्चा करत जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले.

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाचा पराभव करायचा या मुद्यावर एकत्रित आलेल्या सर्व विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. यामध्ये बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीशी जागा वाटपाची चर्चा यशस्वी झाल्यानंतर आज आम आदमी पार्टीशीही लोकसभा निवडणूकांच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले.

आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नवी दिल्लीसह गुजरात, चंदिगड, पंजाब चार राज्यातील निवडणूक युतीवर शिक्कामोर्तब केले. जागा वाटपाच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दोन्ही पक्षात झालेल्या जागा वाटपाची माहिती देताना म्हणाले की, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या चार लोकसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर चांदनी चौक, ईशान्य दिल्ली आणि पूर्व-पश्चिम दिल्लीची परंपरागत जागा अशा मिळून तीन जागा काँग्रेस लढविणार आहे.

पुढे बोलताना मुकुल वासनिक म्हणाले की, हरयाना राज्यातील ९ जागा काँग्रेस एकट्याने लढविणार असून कुरुक्षेत्र हा लोकसभा मतदारसंघ आम आदमी पार्टीला सोडण्यात आला आहे. तर गुजरात राज्यात काँग्रेस २४ जागी निवडणूक लढविणार आहे. तर भरूच आणि भावनगर या लोकसभा मतदार संघात आम आदमी पार्टीला सोडण्यात आले आहेत. याशिवाय चंदिगड आणि गोवा राज्यात काँग्रेस एकटी लढणार असून या दोन्ही ठिकाणी आम आदमी पार्टी मदत करणार आहे.

तसेच पंजाबमध्ये सर्व १३ लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टी एकट्याने लढविणार आहे. तसेच काँग्रेसकडून काही जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता असल्याचे मुकुल वासनिक यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक, अरविंदर सिंग लव्हली, दीपक बाबरीया या तिघांचे शिष्टमंडळ तर आम आदमी पार्टीकडून आतीषी, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक या तिन जणांचे शिष्टमंडळांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *