राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यानंतर सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळ पक्ष कोणाचा यावरून याचिका प्रलंबित आहे. त्यातच देशातील लोकसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने नवे चिन्ह द्यावे द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी या निवडणूक चिन्ह देण्यात आले. या निवडणूक चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या साक्षीने या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेतेही उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात आणि महाराष्ट्रात अनेक राजे-महाराजे झाले. त्यांच्यानंतर अनेक संस्थानिक झाले. परंतु रयतेचा राजा एकच झाला असे सांगत शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, राज्यात सध्याची परिस्थिती पाहता अनेक अडचणी वाढतील अशी परिस्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य हे सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे राज्य होते, तसे राज्य निर्माण करायचे असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार ही खात्री आहे. या ऐतिहासिक भूमित आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असे आवाहनही यावेळी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024