Breaking News

Tag Archives: raigad

येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास …

Read More »

फडणवीस म्हणाले, सरकारने पॅकेज जाहीर केले पण त्याचा फायदा नाही कोकणातील परिस्थितीबाबत सर्वंकष निवेदन सरकारला देणार

दापोली: प्रतिनिधी आज सरकारचे अस्तित्त्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो तरी पण, त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा …

Read More »

निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन

श्रीवर्धन: प्रतिनिधी मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य …

Read More »

शरद पवार दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील 'निसर्गा' चा तडाखा बसलेल्या गावांची करणार पाहणी

मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ९ जून …

Read More »

चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »

नांदेड, रायगड, औरंगाबादेत अडकलात, तेथून मूळ गावी जायचेय ? तर हे वाचा जिल्हा प्रशासनाकडे कसे अर्ज सादर करायचे आणि कोठे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध भागातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू आदी अडकलेले आहेत. सद्यपरिस्थितीत नांदेड, रायगड आणि औरंगाबाद येथे अशा अडकलेल्यांनासाठी त्या त्या स्थानिक प्रशासनाने वेबसाईटची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार आपला अर्ज आणि फोनवरून संपर्क साधून आपल्या मूळ गावी जावू शकता. नांदेड जिल्ह्यातील …

Read More »