Breaking News

Tag Archives: uttar pradesh

हाथरसप्रकरणी राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र हाथरस घटनेवरून लिहिले पत्र दोषींवर कडक कारवाई करा

नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका बुवाच्या सत्संग कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर उडालेल्या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे जवळपास १२० नागरिकांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुंटुबियांना मदत निधीही जाहिर करण्यात आली. तसेच जखमींना उपचार करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

पाण्यासाठी दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, हरियाणा, उत्तर प्रदेशला आदेश द्या सध्या दिल्लीतील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा

मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरणात उष्म्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यातच दिल्लीला पाण्याचा भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच दिल्लीला पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यापार्श्वभूमीवर शेजारील राज्य असलेल्या हरियाणाने दिल्लीला महिनाभरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी दिल्लीतील आप सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, राम मंदिराचे निमंत्रण नाकारून अपमान…

लोकसभा निवडणूकी निमित्त उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे भाजपाच्यावतीने आज ९ एप्रिल रोजी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजपाचे अनेक उमेदवार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दंडाला धरून समोरून जाण्यास सांगितले, त्या घटनेची. …

Read More »

जयराम रमेश यांचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार इंधनाअभावी…

मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बेबनाव निर्माण होत असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकिय क्षेत्रात ऐकायला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे जाहिर सभा होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार …

Read More »

उत्तर प्रदेशातील १६ जागांसाठी मायावती यांनी जाहिर केली बसपा उमेदवारांची यादी पुन्हा कमबॅक करणार की ?

देशाच्या लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशातील ८० जागा महत्वाच्या असून आतापर्यंत भाजपा वगळता या ८० जागांवर कोणालाही लक्ष्य देता आले नाही. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत काहीही करून नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखायचे आणि केंद्रातील सत्तेपासून लांब ठेवायचे अशी रणनीती काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी निश्चित केली. परंतु देशात इंडिया आघाडीचा प्रयोग …

Read More »

राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ पक्का अमेठीतूनच लढणार निवडणूक

देशातील लोकसभा निवडणूकांचा कालावधी आता जवळ आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जाहिरही करण्यात आली. यावेळी अमेठी आणि रायबरेलीत आणि वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील …

Read More »

गंगा नदीत आंघोळीला निघालेल्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने मृत्यू

कासगंज रस्त्याने गंगा नदीत आंघोंळ करण्यासाठी ३० ते ४० जणांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ७ लहान मुलांसह ८ महिलांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरचा अपघात एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर …

Read More »

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर

मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश …

Read More »

नीती आयोगाचा सर्वात मोठा दावा, २४.८ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेतून बाहेर

कोरोना काळापासून देशातील प्रमुख आर्थिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असताना आणि वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने कोरोना काळापासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत अन्न पुरवठा करण्याचा निर्णय घेत ८० कोटी नागरिक या मोफत धान्याचा लाभ घेत असल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यातच आज केंद्र …

Read More »