Breaking News

जयराम रमेश यांचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार इंधनाअभावी…

मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बेबनाव निर्माण होत असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकिय क्षेत्रात ऐकायला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे जाहिर सभा होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार पेट्रोल-डिझेल अभावी फारच धीम्या गतीने चालत असल्याची टीका केली. जयराम रमेश यांच्या या टीकेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील वाढत्या तणावाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ४ जूनला हे इंजिन बंद पडण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीन प्रश्नांची उत्तरे देतील का असा सवालही यावेळी उपस्थित केला.

जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंग साईटवरून पंतप्रधान मोदी यांच्या जाहिरसभे आधी हे तीन विचारत म्हणाले की, सहारनपूर हे लाकडावरील कोरीवकाम अर्थात नक्षी कामासाठी प्रसिध्द आहे. तसेच येथील लाकडासाठीच्या नक्षी कामाची बाजारपेठ २०० वर्षापासून आहे. येथील नक्षी काम जगभरात प्रसिध्द आहे. तसेच हे शहर वुडन सिटी म्हणून ही परिचित आहे. शहराच्या आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण ते ७ लाखांहून अधिकजणांना रोजगार देते.
दुर्दैवाने, लाकूड-कोरीव काम उद्योगाला मोदी सरकारच्या एकापाठोपाठ एक घोडचूकांचा मोठा फटका बसला आहे. आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी आणि शेवटी, अनियोजित साथीच्या लॉकडाऊनमुळे येथील हा उद्योग उद्ध्वस्त झाला आहे, जो तेव्हापासून सावरण्यासाठी धडपडत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, हा उद्योग जेव्हा व्यवस्थितरित्या सुरु होता तेव्हा तो त्याच्या शिखरावर, ते १.५०० कोटींहून अधिक किमतीच्या वस्तूंची निर्यात करत होता, परंतु आज ही संख्या जवळपास ९०% ने कमी झाली आहे. यास कोण जबाबदार आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, सध्याच्या या स्थितीला डबल-इंजिन’ सरकारची सहारनपूरमध्ये तिहेरी दोषी आढळले आहे. त्यांच्या चुकांमुळे त्रस्त असलेल्या लाखो कारागिरांना पंतप्रधान मोदी काय सांगतीय? राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकारने याला पाठिंबा देण्यासाठी काय केले? जुना उद्योग वाचविण्यासाठी आणि त्याला उत्तेजन देण्यासाठी काय केले? याची उत्तरे देतील का खोचक सवालही यावेळी केला.

त्याचबरोबर जयराम रमेश यांनी आणखी एक प्रश्न नरेंद्र मोदी यांना उद्देशून विचारला आहे की, देशात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन उत्तर प्रदेशात होते. तसेच सरकारकडून विकण्यात येत असलेल्या किटकनाशके आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. येथील शेतकऱ्यांकडून ऊसाला कायदेशीर दर मिळावा अशी मागणी सातत्याने करत आहेत. परंतु येथील भाजपा सरकारने प्रति क्विंटल ३६० रूपये इतका दर निश्चित केला आहे. महागाईचा विचार केला तर हा दर परवडण्यासारखा नाही. पंजाबमध्ये प्रतिक्विंटलचा दर ३८५ इतका तर हरयाणामध्ये ३९१ इतका प्रतिक्लिटंल दर आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी एकदा सांगावे की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत देण्यास का अनुत्सुक आहे असा जाबही विचारला.

त्यानंतर जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील महत्वाच्या मोकाट जनावरांबाबतचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, भटक्या गुरांवर कारवाईची वारंवार आश्वासने देऊनही, यूपी सरकार भटक्या गुरांच्या वाढत्या संकटावर उपाय करण्यात अपयशी ठरले आहे, असा दावा करत पुरेशा प्राण्यांच्या आश्रयस्थानांच्या अभावामुळे पशुपालकांना त्यांची जनावरे सोडून देऊन त्यांची काळजी घेणे टाळले आहे. ही गुरे आता शेतकऱ्यांसाठी एक भयानक स्वप्न बनली आहेत – नियमितपणे पिकांची नासधूस करतात, आणि उच्च मूल्याच्या पिकांसाठी त्यांची ओढ पाहता, पीक विविधीकरणाच्या प्रयत्नांना देखील अडथळा आणत आहेत. शेतकऱ्यांना आता चोवीस तास जागरुक रहावे लागते आणि काही जणांचा बैलांच्या हल्ल्यात मृत्यूही झाला आहे, याकडेही लक्ष्य वेधले.

पुढे बोलताना जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक सल्ला देत “सार्वजनिक चर्चांवरून लोकांचे लक्ष्य हटविण्यापेक्षा, पंतप्रधान स्थानिक लोकांशी संबंधित समस्या सोडवू शकतात. तसेच अशा लोकांशी संबधित या समस्या सोडवण्याची त्यांचा दृष्टीकोन काय आहे? पंतप्रधानांनी अशा लोकांशी संबधित प्रश्नांवर त्यांचे “मौन” सोडावे असे यावेळी आवाहनही केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *