Breaking News

सामाजिक

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती

त्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविडच्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या …

Read More »

नामांतर लाँगमार्चचा शनिवारी ४४ वा वर्धापन दिन

औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ऐतिहासिक लाँगमार्चला येत्या शनिवारी ४४ वर्षे पूर्ण होत आहेत. “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड”मध्ये नोंद झालेल्या या लाँगमार्चच्या या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभरात शहिदांना मानवंदना देण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांनाही शाळांमध्ये मिळणार पुलाव आणि बिर्याणी

राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहे. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले …

Read More »

२०२४ निवडणूकीपूर्वी महिला आरक्षण लागू करा: सर्वोच्च न्यायालय म्हणते, मुद्दा चांगला पण…

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी पाच दिवसांचे विशेष अधिवेशन मोदी सरकारने बोलावित देशभरातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर करवून घेतले. मात्र हा कायदा २०२४ च्या लोकसभा निवडणूका झाल्यानंतर जणगणना आणि मतदारसंघांची पुर्नरचना झाल्यानंतर लागू करण्याची घोषणा केली. त्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या डॉ जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतात ६.४ तीव्रतेचा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सुदैवाने सध्या कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसोबतच उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४इतकी मोजली गेली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर …

Read More »

सेक्सटॉर्शन प्रकरणाच्या मुंबईत वाढल्या घटना, कशी घ्याल खबरदारी? समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना या गोष्टी ठेवा लक्षात

सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण मुंबईत प्रचंड वाढले आहे. मुंबईत आत्तापर्यंत बदनामीच्या भीतीने दोन आत्महत्या झाल्या आहेत प्रकरण बोटीने समोर आलेले नाहीये. मुंबईत सेक्सटॉर्शनचे चालू वर्षात आत्तापर्यंत ४९ गुन्हे दाखल झाले. दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. त्यामुळे सायबर जगतात वावरताना सावधगिरी महत्त्वाची असल्याचे सायबर पोलिसांनी म्हटले आहे. असे …

Read More »

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर …

Read More »

दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी सकारात्मकता-शांतता राहन्सयातही दिवाळीपूर्वी ह्या गोष्टी काढा घराबाहेर

दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी करावी लागते ती दिवाळीची साफसफाई.सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ …

Read More »

WorldCup2023: भारताने सहावा विजय नोंदवला, इंग्लंडचा १०० धावांनी पराभव यासह इंग्लंडला या विश्वचषकातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे

WorldCup2023

शमीने चार आणि बुमराहचे तीन विकेट नवी दिल्ली/लखनौ, २९ ऑक्टोबर : WorldCup2023 च्या २९ व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला. यासह भारताने या विश्वचषकात …

Read More »

TrainAccident : आंध्र प्रदेशात दोन ट्रेनच्या धडकेत ८ जण ठार जखमींना विझियानगरम आणि विशाखापट्टणम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे किमान दोन डबे कोठावलसा मंडल (ब्लॉक) येथील कांतकपल्ली जंक्शनजवळ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरने आदळल्याने TrainAccident रुळावरून घसरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या वॉल्टेअर विभागाच्या विझियानगरम-कोट्टावलासा रेल्वे विभागातील अलमांडा आणि कांतकपल्ली दरम्यान झाला.  . ट्रेन क्रमांक 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि 08504 …

Read More »