मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा …
Read More »कामगारांसमोर तगुन रहायचं आव्हान कोव्हीडी -१९ आणि लॉक डाऊन
आज, हजारो घरकामगार महीला आपल्या घरकामा सारखे कामापासून वंचित झाल्या आहेत, सोबत आपले खात्रीचे उत्पन्न ही गमावून बसल्या आहेत. याचा थेट परीणाम त्यांच्या उपजीविकेला बसला असुन आज प्रचंड अस्वस्थता या घर कामगार महीलांमध्ये पसरली आहे, याची प्रमुख दोन कारणे आहेत की एक तर या महीलांची कुटुंबे ही अत्यल्प उत्पन्न गटातील …
Read More »आईच्या १४ व्याचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक न्यायमंत्र्याच्या स्वीय सहायकाकडून सामाजिक जाणीवेच्या "गोड जेवण"चा आदर्श
मुंबई: प्रतिनिधी आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही… कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई …
Read More »शरद पवारांकडून पहिल्यांदाच भक्तांच्या आयटी सेलचा उल्लेख व्हॉट्सअँपच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे आयोजन आहे का?
मुंबई: प्रतिनिधी आज सर्व सामाजिक स्तरावर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये. टेलिव्हिजनवर बघतो, त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत. काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात …
Read More »डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे …
Read More »८ एप्रिलला मुस्लिम बांधवानों घरातूनच नमाज अदा करा तर १४ एप्रिलला डॉ.आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात बदल करण्याचे शरद पवारांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले, काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नसल्याने हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. यापार्श्वभूमीवर ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम समुदायाने हयात नसलेल्यांना कब्रस्तानमध्ये जावून स्मरण न …
Read More »आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ? स्नेहालय संस्थेकडून देणगीसाठी आवाहन
अहमदनगर, दिनांक ३० मार्च २०२०: कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. …
Read More »सर्व दिव्यांगांसाठी खुषखबर, रेशन आणि किट मिळणार एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल आणि आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »घरेलु कामगार कल्याण मंडळामार्फत घर मोलकरणींना पैसे द्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय घरकामगार चळवळीची मागणी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर घरकामगार आणि त्यांच्या मालकांनी संमतीने काम बंद केले. परंतु त्यांचा रखडलेला मार्चचा पगार लगेच मिळणे शक्य नसल्याने या घरकामगार मोलकरणींना पैसे देण्यासाठी राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या घरेलु कामगार मंडळाच्या खात्याकडून थकबाकीची रक्कम देण्यात यावी …
Read More »कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन
अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची …
Read More »