संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज ९ …
Read More »आश्वासनांची पुर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे व आहार व इंधनाचे …
Read More »सरन्यायाधीश चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, भेदभाव वाढल्याने दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ७५ वर्षा प्रतिष्ठित संस्थांबरोबर सहानुभूतीच्या संस्था निर्माणाची गरज
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत मोठं विधान केलं आहे. उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे दलित आणि आदिवासी समाजातील आहेत, हे संशोधनातून समोर आलं आहे. समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाबद्दल सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अशी …
Read More »मासिक पाळी आल्याने सुट्टी द्याः सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आम्ही निर्देश देऊ शकत नाही केंद्र आणि राज्य सरकारकडे जा सांगत याचिका फेटाळून लावली
सर्वोच्च न्यायालयाने नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, हा मुद्दा सरकारच्या धोरणाच्या कक्षेत येत असल्याने त्यावर इथे चर्चा होऊ शकत नाही. मासिक पाळीची सुट्टी देणे हा विषय केंद्र आणि …
Read More »बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर हल्ला बोल मानधन वाढ, शासकिय दर्जा, वेतनश्रेणी आदी प्रश्नी काढला मोर्चा
गेली साडेपाच वर्षे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. मानधनात भरीव वाढ करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप, नवीन चांगला मोबाईल आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आजपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेल्या आहेत. …
Read More »चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक …
Read More »नलगे यांच्यासह या साहित्यिकांना मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कार जाहीर केले. सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे …
Read More »सरकारी-निमसरकारी कर्मचारी- शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर समन्वय समितीने पत्रक काढत दिला इशारा
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत जून्या पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आली. या मुद्यामुळे भाजपा आणि शिंदे गटाला हक्काच्या नागपूर आणि अमरावतीची जागा गमवावी लागली. यापार्श्वभूमीवर नवी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने तातडीने बैठक बोलावत १४ मार्चपासून बेमुदत संपावर …
Read More »शरद पवार यांनी इंदुरीकर महाराजांना दिला जाहिर कार्यक्रमात इशारा, पण प्रेक्षकांमध्ये हशा मी त्यांचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही
वारकरी संप्रदायात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. तसेच त्यांच्या किर्तन सादर करण्याच्या पध्दतीमुळे आणि वास्तवतेतील उदाहरणे देत राज्यातील लोकांमध्ये मनोरंजन आणि अध्यात्मिकतेचे बाळकडू पाजत असतात. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …
Read More »