Breaking News

सामाजिक

बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर हल्ला बोल मानधन वाढ, शासकिय दर्जा, वेतनश्रेणी आदी प्रश्नी काढला मोर्चा

गेली साडेपाच वर्षे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. मानधनात भरीव वाढ करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप, नवीन चांगला मोबाईल आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आजपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेल्या आहेत. …

Read More »

चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक …

Read More »

नलगे यांच्यासह या साहित्यिकांना मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कार जाहीर केले. सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे …

Read More »

सरकारी-निमसरकारी कर्मचारी- शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर समन्वय समितीने पत्रक काढत दिला इशारा

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत जून्या पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आली. या मुद्यामुळे भाजपा आणि शिंदे गटाला हक्काच्या नागपूर आणि अमरावतीची जागा गमवावी लागली. यापार्श्वभूमीवर नवी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने तातडीने बैठक बोलावत १४ मार्चपासून बेमुदत संपावर …

Read More »

शरद पवार यांनी इंदुरीकर महाराजांना दिला जाहिर कार्यक्रमात इशारा, पण प्रेक्षकांमध्ये हशा मी त्यांचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही

वारकरी संप्रदायात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. तसेच त्यांच्या किर्तन सादर करण्याच्या पध्दतीमुळे आणि वास्तवतेतील उदाहरणे देत राज्यातील लोकांमध्ये मनोरंजन आणि अध्यात्मिकतेचे बाळकडू पाजत असतात. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती

वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर बोलताना साहित्यिक आणि साहित्य संमेलनाध्यक्षांना सुखावणारी घोषणा केली असून यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. तसेच मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या …

Read More »

माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आदेश

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ७ फेब्रुवारी रोजीच्या जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मस्थानी आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात यावे. त्याचप्रमाणे माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई …

Read More »

आदीवासीबहुल जिल्ह्यातून हि १७ पदे स्थानिक आदीवासींमधून भरण्याचा निर्णय आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे आदिवासी युवक – युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीत राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ …

Read More »

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. …

Read More »