Breaking News

सामाजिक

केंद्र सरकारने जारी केली अडचणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी राष्ट्रीय हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज …

Read More »

पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधीः दरमहा मिळणार छात्रवृत्ती आणि प्रवास भत्ता १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची …

Read More »

नरोडा पाटिया हत्यांकाड प्रकरणी विशेष न्यायालयाकडून ६९ जणाची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयानेच नेमलेल्या विशेष न्यायालयाचा निकाल

२००२ साली गुजरातमधील गोध्रा कांडानंतर गुजरातमधील अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. या दंगली घडवून आणण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचा कबुली जबाब अनेकांनी कधी स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून तर काही लघुपटासाठी स्पष्ट कबुली जबाब दिला. त्यातील अनेकांना नरोडा पाटिया गावातील हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६९ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश ;परदेशातील एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा बहाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार...

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची बाब …

Read More »

रेल्वे यार्डमधील माथाडी कामगारांना ‘या’ मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांची सूचना

विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा आणि माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे …

Read More »

महात्मा फुले महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करा तीन लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत …

Read More »

‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

“राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे”, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या …

Read More »

महाराष्ट्रातील या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार

सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या …

Read More »

वनमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा, व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प हत्ती संवादकाची मदत घेणार

राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील …

Read More »

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५५ हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी, फोटो पाहिला का? परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर साकारण्यात आली रांगोळी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने परभणी शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल ५५ हजार चौरस फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळीची प्रतिकृती परभणीकरांना …

Read More »